इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरी-१ सुरू; ६ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया

मुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-१ (Open to All) ला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून सुरू झाली असून ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सहभागी होण्यासाठी नवीन नोंदणी केलेल्या तसेच पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘भाग-२’ (Part-2) अर्ज भरून तो ‘लॉक’ करणे अनिवार्य असल्याचे प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका वितरित करण्यात आलेल्या नसल्यामुळे प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) सादर करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, असे निर्देश कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी संबंधित कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर ती महाविद्यालयात सादर करण्यात येतील, असे हमीपत्र (Undertaking) द्यावे. मात्र, गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो, याची विद्यार्थ्यांना व पालकांना जाणीव करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून ‘भाग-२’ अर्ज लॉक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading