Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

मुखपृष्ठ

डी आय आय टी नौकरी मदत केंद्र (महाराष्ट्र राज्य)

प्रिय मित्रांनो,
संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत डी.आय.आय. टी.‘नोकरी मदत  केंद्र’ ची स्थापना केली. देशातील पहिलं नोकरी विषयक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ विकसित करण्याचा मान आम्ही मिळविला आहेच, त्याच बरोबर बेरोजगारांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यात मदत केंद्राची स्थापना केली आहे. २०१३ साली लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर होत असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत. केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले लाखो बेरोजगार याचा लाभ घेऊन नोकरीच्या संधीच्या वाटेवर येत असून महाराष्ट्रासह उस्मानाबाद(धाराशिव)  जिल्ह्याची स्पर्धात्मक ओळख निर्माण होताना मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी निर्मुलन करण्याबरोबरच बेरोजगारांना संघटीत करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचा आमचा मानस आहे.

          उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या परंडा तालुक्यातील देऊळगाव या साधारणतः पाचशे-सहाशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आई-वडिलांचे शिक्षण पहिली पर्यंतच झाले असले तरी आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड-कष्ट करून विश्वासाने झगडत आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. मी मात्र त्यांच्या विश्वासास पात्र न ठरता २००७ साली दहावीच्या वर्गात अगदी काठावर पास झाल्याने आपोआपच पुढील उच्च शिक्षणाचे  मार्ग  बार्शी येथे ११ वी १२ वी काम करत पूर्ण केले व १२ वी उतीर्ण झालो. पुढे काय करावे हा प्रश्न उभा होता त्यात डी एड वारे वाहत होते त्यामुळे २०११ ते १२ मध्ये अध्यापन करावे व शिक्षक व्हावे यासाठी डी एड केले मार्ग सापडेना झाला खूप समस्या वाढत गेल्या काय करावे सुचेना मग मार्ग निवडला संगणक केंद्र चालू करण्याचा आणि मग पुढील शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचाच. आई-वडिलांच्या  सहकार्याने ती प्रत्यक्षात उतरवून नोकरी मदत  केंद्राची स्थापना केली. संकल्पना नवीनच असल्याने त्यावेळी अनेकांची कुचेष्टा सहन करावी लागली असली तरी आज आम्ही आकाशाला गवसणी घालण्या इतपत यश मिळविण्यात यशस्वी होत आहोत.

      वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंत आहेत. पदवी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल दहा वर्ष भटकंती करण्यातच गेली. मात्र आत्मविश्वास आणि प्रयत्न नेहमीच यशाकडे घेऊन जातात अशीच माझी परिस्थिती म्हणावी लागेल. स्वतः वर विश्वास ठेवा कारण प्रत्येकालाच एक संधी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या जिद्द, कृती आणि इच्छा शक्तीची !!

आपला
तानाजी  दत्तात्रय घोडके 
संस्थापक – 'डी.आय.आय. टी.‘नोकरी मदत  केंद्र’

Director Board oF D.i.i.T Educational Institute

      आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत,हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न……

941

Mr.Tanaji D. Ghodake
Director & CEO/MD

 

Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tellus. Praesent sapien massa, convallis a pellentesque nec, egestas non nisi. Curabitur aliquet quam id dui posuere blandit Cras ultricies ligula sed magna dictum porta.

942

Mrs: Sonali T. Ghodake
Director At D.i.i.T Abacus

१२३
9081673329161
GCC-TBC
NIELIT-Preview
https://i0.wp.com/diitnmk.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo.png?resize=512%2C512
logo abaus
error: Content is protected !!