SBI भरती २०२६: मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या ७७ जागांसाठी संधी!
जाहिरात क्र.: CRPD/SCO/2026-27/28 आणि CRPD/SCO/2026-27/29
एकूण जागा: ७७
पदांचा तपशील:
| जाहिरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| CRPD/SCO/2026-27/28 | १ | मॅनेजर (सिक्युरिटी) | ६० |
| CRPD/SCO/2026-27/28 | २ | डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी) | (वरील ६० मध्ये समाविष्ट) |
| CRPD/SCO/2026-27/29 | ३ | असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर (फायर) | १७ |
| एकूण | ७७ |
शैक्षणिक पात्रता व अनुभव:
- पद क्र. १ (मॅनेजर – सिक्युरिटी):
- कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation).
- भारतीय सैन्यातील ‘मेजर’ (Major) किंवा नौदल/वायुदलातील समकक्ष दर्जाचा अधिकारी (किमान १० वर्षे कमिशन्ड सेवा) किंवा अर्ध-लष्करी दलातील ‘डेप्युटी कमांडंट’ किंवा त्यावरील अधिकारी (किमान १० वर्षे सेवा).
- पद क्र. २ (डेप्युटी मॅनेजर – सिक्युरिटी):
- कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation).
- भारतीय सैन्यातील ‘कॅप्टन’ किंवा त्यावरील अधिकारी, अथवा नौदल/वायुदलातील समकक्ष अधिकारी (किमान ५ वर्षे कमिशन्ड सेवा) किंवा अर्ध-लष्करी दलातील ‘असिस्टंट कमांडंट’ किंवा त्यावरील अधिकारी (किमान ५ वर्षे सेवा).
- पद क्र. ३ (असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर – फायर):
- B.E. (फायर) किंवा B.E / B.Tech (सेफ्टी अॅण्ड फायर इंजिनिअरिंग) किंवा B.E / B.Tech (फायर टेक्नॉलॉजी & सेफ्टी इंजिनिअरिंग) पदवी.
- संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव.
वयाची अट (३१ ऑक्टोबर २०२६ रोजी):
(मागासवर्गीयांसाठी सूट: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे)
- पद क्र. १ व २: २५ ते ४० वर्षे
- पद क्र. ३: २१ ते ४० वर्षे
इतर महत्त्वाची माहिती:
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज शुल्क (Fee): General / EWS / OBC साठी ₹७५०/- (SC / ST साठी फी नाही)
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online)
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुधारित शेवटची तारीख: ०२ डिसेंबर २०२६ (पूर्वीची तारीख २५ नोव्हेंबर २०२६ होती)
Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.

