महसूल विभाग तलाठी संवर्गातील पदांच्या एकूण ४६२५ जागा भरणार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या जागा सरळसेवा भरती लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दिनांक १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे, मात्र सदरील भरतीबद्दल आद्याप अधिकृत घोषणा झालेली नसुन त्यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. सदरील जाहिरात/ पदांची माहिती प्रारूप स्वरुपाची असुन खालील बटनवर क्लिक करून डाऊनलोड करावी.