Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

अपंगांना मिळणार मोफत वाहन दुकान भरा (ऑनलाइन फॉर्म)


अपंगांना मिळणार मोफत वाहन दुकान असा भरा ऑनलाइन फॉर्म | divyang apang mofat electric vehicle yojana 2023-24

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

योजनेच्या अटी व शर्ती / Terms and conditions of the scheme

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा / Applicant should be domicile of Maharashtra State

2.अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा.

3.अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. / Applicant must have UDID card.

4.अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.

5.मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.

6.दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे 

7.लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील. 

8.अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यासअशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल. 

9.अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आवश्यक राहील.

१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. 

११. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.

१२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा .

१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.

कोणती कागदपत्रे लागणार । ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे 

१) अर्जदाराचा फोटो / Applicant Photo (Only jpeg, jpg,png and gif image with size 15 KB to 100 KB allowed and Photo image

२) अर्जदाराची सही / Applicant Signature (Only jpeg, jpg,png and gif image with size 3 KB to 30 KB allowed)

३) जातीचा दाखला / Caste Certificate (Size : 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

४) अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

५) निवासी पुरावा / Address Proof (size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

६) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र / Disability Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

७) UDID प्रमाणपत्र / UDID Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

८) ओळखपत्र / Identity Proof (Size: 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

९) बँक पासबुकचे पहिले पान / First page of Bank Passbook (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

१०) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक / Applicant’s Affidavit (Size : 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

अपंगांना मिळणार मोफत वाहन दुकान असा भरा ऑनलाइन फॉर्म : खाली फॉर्म कसा  भरायचा याची माहिती दिली आहे ती वाचून फॉर्म भरा

👉👉अर्ज करण्याची अधिकारीक वेबसाईट : येथे पहा 

Self declaration form pdf – Download

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,141 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5916082
Visit Today : 97
This Month : 196
Who's Online : 2
Your IP Address: 18.97.9.168

मुदतवाढ

error: Content is protected !!