मुखपृष्ठ

941 removebg preview
Mr.Tanaji Ghodake
CEO/MD : DIITWALA

देऊळगाव येथील दिव्यांग ‘तानाजी’ची यशोगाथा संगणक व्यवसायातून फुलविला संसारः सायकल दुरस्ती करण्यासह पानटपरीवर काम करून केला अभ्यास शिक्षणाची ओढ अंतर्मनात असली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. देऊळगाव (ता. परंडा) येथील शेतामध्ये जाऊन काबाडकष्ट करत आपल्या पायाने अपंग असलेल्या युवकाने तानाजी घोडके केली. अपंगत्वावर मात देत नोकरीच्या मागे न लागता स्वतः संगणक व्यवसाय उभारुन संसार फुलविला आहे. तालुक्यातील देऊळगाव या छोट्याशा गावातील जन्मताच दिव्यांग व्यक्ती तानाजी घोडके यांचा जन्म २१ जून १९९० रोजी शेतमजूर कुंटुबात झाला. घरची परिस्थिती बिकट स्वरूपाची होती. आई-वडिलांनी लोकांच्या तीन मुलांची उपजीविका यातील थोरला मुलगा तानाजी हा पायाने दिव्यांग होता. या मुलाला शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव, येथे पहिली ते पाचवीचे शिक्षण झाले. यानंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देऊळगाव ते तांदुळवाडी हा तीन किलोमीटरचा पायी प्रवास किंवा सायकल यावर जाऊन सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय तांदुळवाडी येथे घेतले. तेथील शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केल्याने दहावी मध्ये जेमतेम या ६४ टक्के मार्क मिळवून यश संपादन केले.
माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असताना गावामध्ये सायकल दुरुस्त करणे, पानटपरीवर बसून अभ्यास करणे, अशा स्वरूपाची कसरत करून तानाजीने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बारावी पूर्ण केले. एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये अर्धवेळ काम करुन, भाड्याच्या रूममध्ये राहून अभ्यास केला. घरची हलाकीची परिस्थितीची जाणीव ठेवत आपला शिक्षणाचा खर्च पूर्ण केला. पुणे शहरात या शहरातून डी.एडचे शिक्षण छोटी-मोठी कामे पूर्ण केले. डी. एड चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडगाव मावळ येथील याच कॉलेजमध्ये क्लर्क या पदावर एक वर्ष काम केले. हे काम करत असताना विविध प्रकारचे कटु अनुभव आले. नोकरीच्या मागे न लागता या अनुभवातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे व स्वतः काहीतरी बनावे ही जिद्द, चिकाटी मनामध्ये ठेवून गावी देऊळगाव येथे परत आला. काही दिवस खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगले. यावेळी मनामध्ये एक खूणगाठ होती, दिव्यांगाने स्वावलंबी बनावे. म्हणून नोकरी न मिळाल्यामुळे खचून न जाता सन २०१३ मध्ये परंडा येथे तालुक्याच्या ठिकाणी ‘डीआयआयटी संगणक इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले व त्यांना चांगले संगणकाचे ज्ञान देऊन उत्तुंग यशस्वी अधिकारी बनवण्यासाठी सहकार्य केले.
सन २०१५ मध्ये निमगाव (टें) ता. माढा येथील सोनाली गायकवाड यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर या दोघांनी “हम साथ साथ है ” म्हणत संगणक व्यवसायाला भरभरून गती देत प्रगतीच्या दिशेने झेप घेतली. दिव्यांग तानाजी घोडके यांनी डीआयआयटी, आपले सरकार सेवा केंद्र, डीआयआयटी अबॅकस इन्स्टिट्यूट, यश संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट, अशा विविध संगणक क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थांची संघटना चालवण्यासाठी यांनी खूप कष्ट करून हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केला.
परंडा सारख्या शहरांमध्ये दिव्यांगासाठी काम करणारी स्वतःची संघटना असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यांनी ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या स्थापने अंतर्गत दिव्यांग उद्योग समुह , महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आजपर्यंत तालुक्यामध्ये अनेक दिव्यांग शिबिरे, दिव्यांगाच्या हक्कासाठी मोर्चे यामध्ये भाग घेऊन दिव्यांगाना दिशा देण्याचे काम करत आहोत.

आपलाच तानाजी घोडके 

अध्यक्ष : डी.आय.आय.टी नौकरी मदत केंद्र 

error: Content is protected !!