सन २०२१-२२ इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET)


सन २०२१-२२ इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET)

Application For Common Entrance Test For 11th Std Admission Year

इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.

  1. सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल..
  2.   सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी १२५ गुणांचे प्रश्न असतील, परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
  3.  सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल..
  4. सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ करण्यात येईल.
  5. 11वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असल्याने; इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ/ परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यासाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल.
  6.  सन २०२० २१ या शैक्षणिक वर्षासाठी इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. १० परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि, C.B.S.E.. CI.S.C.E.. सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.
  7. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान घोषीत झाला आहे. सामाईक प्रवेश परीक्षा इयत्ता १० वीच्या निकालानंतर २०  जुलै महिनाअखेर अथवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा आयोजित करण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी.
  8. इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्याथ्र्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291965
This Month : 1126
Hits Today : 413
Total Hits : 494256
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/